ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसातारा

प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्यावतीने विशेष वाहन तपासणी मोहिम

सातारा : मा. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या राज्यस्तरीय आढाव्या दरम्यान अपघात व त्यावरती करावयाच्या उपाययोजनाबाबत उच्चस्तरीय बैठक पार पाडली. गतवर्षाच्या तुलनेत सातारा जिल्हयामध्ये अपघात व अपघाती मृत्यु यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्याबाबत आकडेवारीचे शास्त्रोक्त विश्लेषण त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सूचना व निर्देश प्राप्त झाले आहेत. अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने या कार्यालयामार्फत माहे एप्रिल-2023 ते ऑगस्ट -2023 तसेच माहे ऑगस्ट-2023 मध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहिम राबिवण्यात आली. सदर तपासणी मोहिमेमध्ये अपघात रोखण्यासाठी, मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करणे तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे मुद्देनिहाय तपासणी करण्यात आली.

1.खाजगी बस तपासणी मोहिम :- रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यालयामार्फत माहे एप्रिल-2023 ते माहे ऑगस्ट-2023 मध्ये खाजगी बस तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये एकूण 5535 बसेसची तपासणी करुन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1790 दोषी बसेसवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

2.ऑटोरिक्षा तपासणी मोहिम :-
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहे एप्रिल-2023 ते माहे ऑगस्ट-2023 मध्ये ऑटोरिक्षा तपासणी मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 97 रिक्षांवर कारवाई करण्यात आली व दोषी ऑटोरिक्षा वाहन चालकाकडून खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

4.194Dअन्वये कारवाईबाबत :-
दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 129 व 194D मधील हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींची अंमलबजावणी करणेसाठी या कार्यालयातील सर्व कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत त्यामध्ये माहे एप्रिल-2023 ते माहे ऑगस्ट-2023 मध्ये विना हेल्मेट वापरणाऱ्या एकूण 9518 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 194D अन्वये दुचाकीचा जास्ती जास्त वापर करण्यारे संबंधीत 319 आस्थापना, कार्यालये, संस्था/कंपन्या यांना नोटीस देऊन त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणिव करुन देणेबाबत तसेच याबाबत त्याचे पालन न करणाऱ्या संस्था/ कंपन्या कार्यालये आस्थापना यांचे ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील सीसीटीव्ही तपासून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश सर्व कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.

5.राष्ट्रीय महामार्गावर अपघात टाळण्यासाठी विशेष तपासणी :-
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महामार्गावर अवैधरित्या थांबा घेणाऱ्या वाहनांवर NHAI पथकामार्फत नियमितपणे कारवाई केली जाते. माहे ऑगस्ट 2023 या कालावधीत NHAI पथक, आनेवाडी पथक, खंडाळा पथक या पथकाकडून राष्ट्रीय महामार्गावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1488 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच माहे एप्रिल 2023 ते ऑगस्ट- 2023 या कालावधीमध्ये एकूण 9350 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

6.दुचाकीस्वारांच्या सुरक्षेतसाठी हेल्मेट तपासणी:-
या कार्यालयामार्फत माहे एप्रिल-2023 ते माहे ऑगस्ट-2023 मध्ये दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे..

7.एकूण कारवाई :-
या कार्यालयामार्फत माहे एप्रिल-2023 ते माहे ऑगस्ट-2023 मध्ये अंमलबजावणी पथकाकडून वाहन तपासणी करताना एकूण 18404 दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

8.अपघात आकडेवारी :-
प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांनी केलेल्या सुक्ष्म नियोजन,अंमलबजावणी व प्रबोधनामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या कमी झालेली आहे. सन 2022 च्या तुलनेत सन 2023 मध्ये अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण 5.47% ने कमी झाले आहे. तसेच संबंधित अपघातांची संख्या 4.52% नी कमी झाली आहे.

वरीलप्रमाणे विशेष तपासणी मोहिम या कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने यापुढेही नियमितपणे राबविली जाणार असून त्यासाठी सर्व वाहन धारकांनी वाहन चालविताना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मोटार वाहन नियमांचे तंतोतंत पालन करावे व रस्ता सुरक्षा साध्य करण्यास सहकार्य करावे. यांनी योगदान दिले. सदर मोहिम राबविण्यासाठी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक

सर्व वाहन धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वाहन चालविताना मोटार वाहन कायद्यातील नियमांचे तंतोतंत पालन करून रस्ता सुरक्षा साध्य करण्यास व विना अपघात वाहन चालवून आपली व रस्ता वापरणाऱ्या इतर घटकांची सुरक्षा साध्य करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button