breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एअरटेलची जबरदस्त ऑफर, रिचार्जवर ५० टक्के कॅशबॅक

नवी दिल्ली – इंडियन टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा जबरदस्त वाढली आहे. खास करून प्रीपेड प्लान्स सोबत कंपन्या अनेक फायदे आपल्या सब्सक्रायबर्संना देत आहे. आता भारती एअरटेलकडून युजर्संना प्रीपेड रिचार्ज केल्यास कॅशबॅक ऑफर देत आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांपासून अनेक ऑफर्स आणले आहेत. ज्यात हायस्पीड डेटा सोबत सर्व नेटवर्क्सवर फ्री कॉलिंगचा फायदा युजर्संना मिळत आहे. कॅशबॅक ऑफर केवळ अॅमेझॉन पे वरून रिचार्ज करणाऱ्या युजर्संना मिळणार आहे.

कॅशबॅकचा फायदा अॅमेझॉन पेच्या मदतीने रिचार्ज करणाऱ्या युजर्संना मिळणार आहे. ही ऑफर केवळ अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी आहे. प्रीपेड नंबरवरून रिचार्ज केल्यास ५० टक्के किंवा ४० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. केवळ ३० ऑक्टोबर पर्यंत वैध असणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यसाठी युजर्संना आपल्या अॅमेझॉन प्राईम अकाउंटवरून लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर कॅशबॅक रिवार्ड कलेक्ट करावा लागणार आहे.

३० ऑक्टोबर पर्यंत ऑफर
रिवार्डच्या मदतीने युजर्सला आपल्या अॅमेझॉन पे बॅलन्स वरून प्रीपेड नंबरवर रिचार्ज करता येवू शकणार आहे. म्हणजेच कॅशबॅक रिवार्ड अॅमेझॉन पे वॉलेटवर मिळणार आहे. या ऑफरचा फायदा एअरटेलच्या अॅप किंवा वेबसाईटवर जावून अॅमेझॉन पे यूपीआय च्या मदतीने रिचार्ज केल्यानंतर मिळणार नाही. कंपनीने या ऑफरचा फायदा १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत आणला आहे. कॅशबॅक अमाउंट रिचार्ज केल्यानंतर तीन दिवसात युजर्संच्या अकाउंटवर क्रेडिट होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button