breaking-newsराष्ट्रिय

मालवाहतुकदारांच्या संपाच्या देशभर संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली – मालवाहतुकदारांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. मालवाहतुकदारांनी कालपासून देशभर बेमुदत संप सुरू केला आहे. डिझेलचा “जीएसटी’अंतर्गत समावेश करण्यात येऊन केंद्रीय आणि राज्यांचे कर कमी करण्यात यावेत ही वाहतुकदार संघटनेची प्रमुख मागणी आहे. मुंबईमध्ये या संपाचा लक्षणीय परिणाम जाणवला. तर दिल्लीसह देशाच्या अन्य भागात तुलनेने संपाला कमी प्रतिसाद जाणवला.

या संपाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सर्व राज्ये, जिल्हा आणि तालुका पातळ्यांवरील संघटना आणि स्थानिक संघटनांच्या सदस्यांनी या संपाला पाठिंबा दर्शवला आहे, असा दावा “ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस’च्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाळ मलकित सिंग यांनी केला आहे.

दिल्ली, राजधानी परिसर, महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण भारत, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, चंदिगड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचलप्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि जम्मू काश्‍मीरमधील मालवाहतुक पूर्णपणे बंद होती, असेही सिंग यांनी सांगितले. अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतुक या संपातून वगळण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button