breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरात अपहृत पोलिसाची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाची हत्या केली. सलीम शाह असे हत्या झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी होते. काही दिवसांची रजा घेऊन शहा त्यांच्या घरी गेले होते. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांचा एक गट त्यांच्या घरी पोहचला. त्या गटाने शहा यांचे अपहरण केले. त्यानंतर आज एका ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला.

शहा यांच्या हत्येमागे असलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी तातडीने मोहीम हाती घेतली. काश्‍मीरमध्ये काही दिवसांपासून सुरक्षा जवानांच्या अपहरणाच्या आणि हत्येच्या घटना वारंवार घडत आहेत. काश्‍मीरमध्ये सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सुरक्षा दल असतात. सुरक्षा दलांकडूूनही दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button