breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कर संकलन विभागाच्या अभय योजनेला मुदतवाढ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 267 अ मधील तरतूदीनुसार महापालिका हद्दीतील दिनांक 04/01/2008 रोजीचे व त्यानंतरचे अवैध बांधकामांना देय मालमत्ता करांचे दुपटी इतकी अवैध बांधकाम शास्ती सन 2012-2013 पासून आकारणी करुन वसूल करणेत येत आहे.

महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाकडील शासन निर्णय , परिपत्रके व पत्रान्वये आदेशित केलेनुसार निवासी बांधकाम असलेल्या 1000 चौरस फूटापर्यंत मिळकतींना अवैध बांधकाम शास्ती माफ करणेत आली असून 1001 ते 2000 चौरस फूटामधील निवामी मिळकतींना मूळ कराचे 50 % अवैध बांधकाम शास्ती कर आकारणेत येत आहे . 2000 चौरस फूटावरील निवासी तसेच विगरनिवासी , औद्योगिक मिळकतींना मूळ कराचे दुप्पट अवैध बांधकाम शास्ती आकारली जाते.

उर्वरीत मिळकतींचे अवैध बांधकाम शास्ती कराचे माफीबाबत अद्याप निर्णय प्रलंबित असल्याने मिळकतधारक मूळ कराचा भरणाही करत नसल्याने मूळ कराची थकबाकी वाढत आहे. कोविड – 19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांचे उत्पन्नाचे खोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहे. परंतु अवैध बांधकाम शाम्ती कगचा भरणा केला नसल्याने मूळ करासह थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. अशा मिळकतधारकांना अवैध बांधकाम शास्ती कराची रक्कम वजा जाता उर्वरीत संपूर्ण मिळकतकर एक रकमी भरणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

भविष्यात महाराष्ट्र राज्य शासनामार्फत अवैध बांधकाम शास्ती कर माफ करणेबाबत निर्णय झाल्यास भरलेल्या रक्कमेचे मूळ करामध्ये समायोजन करण्यात येईल, अशा प्रकारची पोहोच पावती नागरिकांना देण्यात येईल. जे मिळकतधारक थकबाकीसह (अवैध बांधकाम शास्ती कराची रक्कम वगळून) संपूर्ण मिळकतकराची एक रक्कमी 100 % रक्कम भरणा करतील त्यांना आकारणेत आलेल्या मनपाकराचे विलंब दंड रक्कमेचे 90 % सवलतीच्या अभय योजनेस 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. नागरिकांना 02 जून 2020 पासून महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयामध्ये रोख / धनादेश ( डी.डी.द्वारे मिळकत कराचा भरणा करता येईल.

तसेच महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी दिनांक 30 जून 2020 पूर्वी एक रक्कमी मिळकत कराचा भरणा करुन सामान्य करातील विविध सवलत योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button