breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

माझं काय चुकलं, आता माघार नाय, अपक्ष लढणार – माजी आमदार आण्णा बनसोडे

जोरदार शक्तीप्रदर्शन करत उद्या भरणार अर्ज, राष्ट्रवादीत बंडखोरी करणार

पिंपरी, महाईन्यूज – माझं काय चुकलं, असा सवाल पिंपरीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. आता माघार नाय, म्हणत उद्या (शुक्रवारी) हजारो समर्थकासह पिंपरीत शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बनसोडे यांनी चिंचवडमध्ये सांगितले.

https://www.facebook.com/mahaenews1/videos/130509495002264/

पुढे ते म्हणाले की, गतपंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत दोन हजार मतांनी माझा निसटता पराभव झाला. तरीही पाच वर्ष मतदारांच्या संपर्कात राहून काम केले. यंदा राष्ट्रवादीची मला उमेदवारी मिळेल, याची खात्री होती. मात्र, मला नक्की का डावलले? माझं कुठे आणि काय चुकले हेच समझेना झालं आहे. आता मी कुठल्याही परस्थितीत माघार घेणार नाही.

शुक्रवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबामाळ चौकातून समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवाराचे प्रामाणिक काम केल्याची ही पोचपावती मला मिळाली आहे. त्यामुळे माझ्याबरोबर पक्षातील व विरोधी पक्षातीलही अनेक नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार आहेत. त्यांच्या पाठींब्यावरच मी निवडणुकीस उभा राहणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button