breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णाभाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांची बंडखोरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी भाजप विरोधात बंडखोरी करत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी (दि.3) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छूक होते. भाजप-शिवसेना महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आकुर्डीतील खंडोबा माळ चौक ते प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवनापर्यंत पदयात्रा काढून आणि शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित गोरखे म्हणाले की, “पिंपरी विधानसभा मतदारसंघातील माझे सहकारी, मित्र मंडळ आणि समर्थकांच्या पाठिंब्यावर मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळावर काम करण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यास आणि विविध योजनांना चालना देण्याचे भरीव काम मी अल्पावधीत केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा भौतिक विकासाबरोबर शैक्षणिक, सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी मतदार आपल्यावर या मतदारासंघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी टाकतील, असा विश्वास आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button