breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेचे आमदार चाबुकस्वार यांनी भरला उमेदवारी अर्ज

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे आज दुपारी दिडच्या सुमारास आमदार चाबुकस्वार यांचे आगमन झाले. खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमद साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, भाजपच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख गिरीश सावंत, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता पिंपरी येथून दुचाकी रॅलीने शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आकुर्डी येथील सेना भवन येथे जमा झाले. तेथून उघडया जीपमध्ये बसून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार नागरिकांना अभिवादन करत निवडणूक कार्यालयात पोहोचले. यावेळी शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button