breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. यातच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव देखील यावर्षी अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसिद्ध असलेले अनेक सार्वजनिक गणेश मंडाळाने यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव ऐवजी आरोग्योत्सव आयोजन करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने सोमवारपासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आलं. तसेच या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचा धोका टाळणयासाठी लालबागचा राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव आणि समाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. लागबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीची प्रतिष्ठपना केली तर, गर्दी होण्याची अधिक शक्यता आहे. ज्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो, हे नाकारता येणार नाही. लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडाळाने केईएम रुग्णालयाच्या साथीने प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली आहे. इच्छुकांना 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच या प्लाझादान शिबिराचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात रविवारी संध्याकाळपर्यंत आणखी 9 हजार 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 260 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहचली आहे. यापैंकी 15 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button