breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: धक्कादायक! दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची गोळ्या घालून हत्या

करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर गर्दी केल्याचं चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने दारु खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

लॉकडाउनला ४२ दिवस पूर्ण झाल्यानंतर १ मे रोजी सरकारने काही अटींसह रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्य मद्यविक्री करण्यास परवानगी दिली. वृत्तानुसार, आरोपीने आपल्या २५ वर्षीय पत्नीला चार वर्षाच्या मुलासमोरच गोळी घातली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

आरोपी दीपक याने पत्नीला दारु विकत घेण्यासाठी पैसे मागितले होते. पत्नीने नकार दिल्यानंतर दोघांमध्य शाब्दिक चकमक झाली. यानंतर आरोपीने पत्नीच्या डोक्यात गोळी घातली. यावेळी त्यांचा चार वर्षाचा मुलगा तिथेच हजर होता. भीतीपोटी त्याने घरातून पळ काढला आणि झुडपात जाऊन लपला. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्याने शेजारीही धावत आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच दाखल झाले होते.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दांपत्याचा मुलगा झुडपात लपला असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर चार तासांनी त्याचा शोध लागला. यानंतर मुलाने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा चार महिन्यांची गर्भवती होती. चार वर्षांपूर्वी दीपक आणि नेहाचं लग्न झालं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button