breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन
मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचं वृद्धापकाळ्ने निधन झालं आहे. त्यांचं वय 75 होतं. मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री 11 वाजता अनघा यांचं निधन झालं. दादर इथल्या स्मशानभूमित त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अनघा यांचा 14 मे 1964 रोजी मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे.