breaking-newsराष्ट्रिय

‘प्रभू रामचंद्र मुस्लिमांचेही पूर्वज, मंदिर निर्मितीसाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा’

प्रभू रामचंद्र हे मुस्लिमांचेही पूर्वज आहेत त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम भेद बाजूला ठेवून सगळ्यांनीच मंदिर निर्मितीसाठी एकत्र यावं असं आवाहन योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. भक्ती ही एक अशी गोष्ट आहे ज्याबाबत कोणावरही सक्ती करता कामा नये. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी काही मध्यस्थांची नेमणूक केली आहे. मात्र त्यातून फारसं काही हाती येईल असं वाटत नाही असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालीच प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती होईल असा विश्वासही बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. राम मंदिर निर्मितीच्या दोन पद्धती आहेत एकतर सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय द्यावा. समजा तसे झाले नाही तर मग जनताच राम मंदिर निर्मितीचे कार्य हाती घेईल त्यांना रोखणे कुणालाही शक्य होणार नाही असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

राम मंदिर निर्मितीसाठी संत केंद्र सरकारवर दबाव आणत आहेत. विश्व हिंदू परिषदेनेही राम मंदिर निर्मितीची मागणी केली आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर बांधलं जावं अशी मागणी विहिंपने केली आहे. या मार्गात जे अडथळे आहेत ते लवकरात लवकर दूर झाले पाहिजेत असेही विहिंपने आणि संत परिषदेने म्हटले आहे. दरम्यान बाबा रामदेव यांनीही राम मंदिर निर्मितीसाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलं आहे.

आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं देशभरात आयोजन करण्यात आलं होतं. नांदेडमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी योगासनं करत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. योग हा जगभरात पोहचवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं. त्याचवेळी त्यांनी राम मंदिराबाबतही भाष्य केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button