breaking-newsमहाराष्ट्र

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना कोरोनाची लागण

बुलडाणा – बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा कोरोना रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. सपकाळ हे कालच मुंबईहुन परतले होते. त्यांना ताप आला होता दरम्यान आज; मोताळा तालुक्यात काँग्रेसच्या अनेक जणांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असल्यामुळे गर्दीत जाण्याआधी संशय नको म्हणून, सपकाळ यांनी कोरोना चाचणी करून घेतली.

त्यावेळी रॅपिड टेस्टींगमध्ये त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हर्षवर्धन सपकाळ हे मुंबईला अनेक जणांच्या संपर्कात आले होते. त्यात राहुल बोंद्रे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनूसार सपकाळ यांच्यासोबत राहुल बोंद्रे, आ.अमित झनक, आ.कुणाल पाटील, हैदर यांच्यासोबत नुपाल पाटील यांच्या मरिन ड्राईव्ह येथील घरी निवांत बसलेले दिसतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button