breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्राच्या ईशा-पार्थ जोडीचा सुवर्ण वेध

नेमबाजीच्या मिश्र दुहेरीत हरियाणाचा धुव्वा

चेन्नई : महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे व पार्थ माने जोडीने लौकिकास साजेशी कामागिरी करीत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत मिश्र दुहेरीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण वेध साधला. चेन्नई येथे सुरु असलेल्या गुरुनानक महाविद्यालयच्या शूटिंग रेंजमध्ये हरियणा संघाचा १६-६ गुणांनी धुव्वा उडवीत महाराष्ट्राच्या ईशा- पार्थने पदकाची बाजी मारली.

अंतिम लढतीत हरियाणा संघाच्या दिशा धनकर व अर्षित अरोरा यांनी सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. ६ व्या फेरीत ईशा-पार्थ यांनी प्रत्येक शॉट अचूक मारताना सहा वेळा २ गुणांची कामाई करताना विजय सकाराला.

ईशा आणि पार्थ या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धामध्ये दमदार कामागिरी केली आहे. महाराष्ट्राचे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरूर यांच्या मुंबईतील लक्ष्य अकादमीऔ सराव करतात.

हेही वाचा – महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलीस जवानांना शौर्य पदके

अमरावतीमध्ये सहाव्या वर्षापासून खेळाचा श्री गणेशा करणाऱ्या ईशाने चार आंतरराष्ट्रीय पदके जिंकली असून युवा स्पर्धेत तिने विक्रमाची नोंद केली आहे. ईशाने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडियात पदकाचा करिश्मा घडविला. पार्थने प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातली. २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हे खेलो इंडियातील यश उर्जा देणारे असल्याचे ईशाने सांगितले.

पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालय क्रीडा विभाग कक्ष अधिकारी रणसिंह डेरे, पथक प्रमुख विजय संतान, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, संजय शेलार, जागतिक विजेते नवनाथ फरताडे, विश्वजीत शिंदे, संदीप तरटे, अजित पाटील, नेहा साप्तेसह दोन्ही खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button