breaking-newsपुणे

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अभियंता-अधिकारी सेनेची पुणे विभागाची कार्यकारीणी जाहीर

– अध्यक्ष पदी राजेंद्र गाढवे तर सल्लागार पदी संतोष सौंदणकर यांची नियुक्ती

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अभियंता-अधिकारी सेना संघटनेची विभागनिहाय प्रदेश कार्यकारीणी‌ नुकतीच जाहीर करण्यात आली. पुणे विभागाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांची संघटनेच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.

भारतीय कामगार सेना अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अभियंता-अधिकारी सेनेची पुणे, कोकण, मराठवाडा आणि नागपूर विभागातील कार्यकारीणी जाहीर करण्यात आल्या. पुणे विभागाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, सल्लागार पदी शिवसेना संघटक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांच्यासह १२ जणांची कार्यकारीणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

उपाध्यक्ष सचिन जाधव, कार्याध्यक्ष सुनील पाटील, सचिव सागर गिरी, सहसचिव यशवंत गंबरे, संघटक सचिव शरद दोलताडे, मार्गदर्शक राज कुलकर्णी, संघटक शंकर उरकुडे, सहसंघटक बाबासाहेब काटकर, महिला आघाडी प्रमुख मेघा शिवगुंडे, समन्वयक नितीन माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वरील पदाधिकाऱ्यांची निवड करुन त्यांच्यावर संघटनेच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button