breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एक हजार चाैरस फूटापर्यंत अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ – आमदार लक्ष्मण जगताप

  • भाजपाने जनतेला  दिलेला शब्द पाळला, हजारो घरांना होईल फायदा, भाजपचा दावा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिझीया कर लावला होता. हा जिझीया कर माफ करण्याचे आश्वासन भाजपकडून नागरिकांना दिले होते. त्यानूसार पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार चाैरस फुटापर्यंत मिळकतधारकांना त्यांच्या अवैध बांधकामाचा शास्तीकर शंभर टक्के माफ करण्यात आला असून त्याचा सुमारे हजारो घरांना लाभ होईल, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्या उमा खापरे, अमित गोरखे, प्रमोद निसळ, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भाजप सरकारने दिलासा दिला आहे. अवैध बांधकामाचा शास्तीकर हा पुर्वलक्ष प्रभावाने माफ करण्यात आला आहे.  1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. यामुळे गरीब आणि निमगरीब लोकांना त्याचा फायदा होणार आहे.

शहरातील अवैध बांधकामांना 2008 पासून शास्तीकर लागू आहे. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन 2012 पासून सुरु केली. सुमारे 70 हजारहून अधिक मालमत्तांना शास्तीकर लागू आहे. राज्य सरकारने यापुर्वी 500 चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ केला होता. आता 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आला आहे. 601 ते 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या 18 हजार 150 मिळकती आहे. त्यांना याचा लाभ होणार आहे.

तसचे  1000 हजार ते 2000 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींना मालमत्ता कराच्या 50 टक्के दराने शास्तीकर आकरण्यात येणार आहे. तर, 2000 हजार पुढील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्तीकर आकारण्यात येणार आहे. शहरातील 1000 हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ करण्यात आला आहे. याविषयी निर्णयाच्या आदेशाची प्रत राज्य सरकारचे सह सचिव सं.श. गोखले यांनी शुक्रवारी (दि.8) महापालिका आयुक्तांना पाठविली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button