breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 14,93,884 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. गुरुवारी आढळलेल्या 13 हजार 395 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 14 लाख 93 हजार 884 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 358 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 39 हजार 430 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 15 हजार 575 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 12 हजार 016 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 41 हजार 986 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 2 हजार 823 नवे रुग्ण आढळले, तर 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 22 हजार 761 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 293 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 86 हजार 675 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजार 789 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 2 हजार 039 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 01 हजार 392 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 028 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 1 हजार 518 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 2 लाख 61 हजार 565 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी आढळलेल्या 2 हजार 039 नव्या रुग्णांपैकी 798 रुग्ण पुणे शहरातील असून 561 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहराची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 52 हजार 200 एवढी झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 503 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button