breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

टेक्नो स्पार्क पॉवर २ एअर भारतात लाँच, ४ दिवसांपर्यंत बॅटरी चालणार

नवी दिल्ली – Tecno Spark Power 2 Air ला अखेर सोमवारी भारतात लाँच करण्यात आले आहे. टेक्नो बजेट फोनचे टीझर गेल्या काही दिवसांपासून जारी केले जात होते. टेक्नो स्पार्क पॉवर २ एअर मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आमि 6000mAh बॅटरी यासारखे फीचर्स आहेत. २० सप्टेंबर रोजी फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता सेलला सुरूवात होणार आहे.

Tecno Spark Power 2 Air: ची किंमत
टेक्नोच्या या बजेट हँडसेटला देशात ८ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोनला कॉस्मिक शाईन आणि आईस झेडाइट कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. फ्लिपकार्टवरून अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. तर अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डसोबत ५ टक्के सूट मिळणार आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा घेता येवू शकते.

Tecno Spark Power 2 Air: ची वैशिष्ट्ये
टेक्नो च्या या फोनमध्ये ७ इंचाचा एचडी प्लस इनसेल आयपीएस (1640 x 720 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचे स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए २२ क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. इनबिल्ट स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोन अँड्रॉयड १० वर चालतो.

टेक्नो स्पार्क पॉवर २ एअरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा, २ मेगापिक्सलचा सोबत एआय लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी ड्यूल फ्रंट फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा मायक्र शॉट्स, एआय स्टीकर्स, बोकेह आणि एआय एचडीआर मोड सपोर्ट करते. फोनमध्ये स्टिरियो साउंडसाट ड्यूल स्पीकर्स दिले आहेत.

फोनला पॉवर देण्यासाठी टेक्नोच्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये बॅटरी चार दिवसांपर्यंत चालणार आहे. हँडसेट मध्ये रिर वर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच फेस अनलॉक फीचर सुद्धा या फोनमध्ये दिले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, जीपीएस, जीपीआरएस, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11 बी/जी/एन/एसी, 3.5 एमएम ऑडियो जॅक यासाऱके फीचर्स दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button