breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर माईंनी भाजपा शहराध्यक्ष आ. लांडगे यांना भरविला बिहार निवडणूकीच्या विजयाचा पेढा

पिं.चिं.शहर भाजप कार्यलयात बिहार निवडणूकीचा विजयोत्सव

पिंपरी । प्रतिनिधी

बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपा + जेडीयू आघाडीची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरु असून जवळ-जवळ भाजपा + जेडीयू आघाडीचा विजय स्पष्ट झाला आहे.
बिहार विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त जागा निवडून आल्यामुळे भाजप क्रमांक 1 चा पक्ष म्हणून पुढे आला आहे.

सर्व देशभरात बिहार निवडणुकीचा विजय साजरा होत असताना शहराच्या वतीनेही पक्ष कार्यलयात हा विजय साजरा करण्यात आला याप्रसंगी शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भाजपा शहराध्यक्ष आ.महेशदादा लांडगे यांना विजयी पेढा भरवून बिहार निवडणूकीत पक्षाचा विजय साजरा केला.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, मा.नगरसेवक सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, सरचिटणीस विजय फुगे, शहर उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, भाजयमोचे उपाध्यक्ष जवाहर ढोरे, अंकुशराव लोंढे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, संजय परळीकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखिल बिहार विजयाचा आनंद साजरा केला.

पुन्हा एकदा विकासपुरुष मा. नरेंद्रजी मोदी यांचे खंबीर नेतृत्व व लोकपयोगी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केल्या मुळेच जनतेने भाजपाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे’ असे प्रतीपादन शहराध्यक्ष आ.महेश लांडगे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button