breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पीओकेच्या पंतप्रधानची पाकिस्तानकडे भारतावर हल्ला करण्याची धमकी

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून षडयंत्र सुरुच आहे. एकीकडे दहशत पसरली तर दुसरीकडे युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. कधी पाकिस्तानच्या वतीने तर कधी पाकिस्तानी लष्कराकडून नापाक हरकती सुरुच आहेत. आता पाकिस्तानच्या अवैधपणे व्याप्त केलेल्या पीओकेचा पंतप्रधान राजा फारूक हैदर याने युद्धाची धमकी दिली आहे.

पीओकेचा पंतप्रधान राजा फारूक हैदर याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतावर हल्ला करण्यास सांगितले आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सैन्याला भारतावर आक्रमण करण्याचे आदेश द्यावेत, असे राजा फारूक हैदर याने म्हटले आहे. इम्रान खान यांनी भारताविरूद्ध कठोर कारवाई करावी. केवळ वक्तव्य करुन चालणार नाही. भारत पीओकेबाबत हवामानाचा अंदाज वर्तवित आहे आणि पाकिस्तानने आता दिल्लीचे हवामान अद्ययावत जाहीर केले पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button