breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीव्यापार

पहिल्या तिमाहीत चीनची वाढ २ % घटणार, जागतिक आर्थिक वृद्धी २ % कमी हाेणार

बीजिंग | वुहानमधून पसरत चाललेल्या काेराेना व्हायरसची लागण झालेल्या चीनसह जगभरात संख्या वाढत जात आहे. काेराेना व्हायरसच्या भयानक संसर्गामुळे २०० पेक्षा जास्त बळी गेलेले आहेत. तया वाढत चाललेल्या संसर्गाने केवळ माणसांनाच नाही तर आता शेअर बाजारांपर्यंत आपला संसर्ग पाेहचवला आहे.

या संसर्गामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचे नुकसानही वाढत आहे. पूर्ण वुहान शहर सध्याच्या घडीला लाॅकडाऊन स्थितीमध्ये आहे. या शहरात राहणाऱ्या जवळपास १.१ काेटी लाेकसंख्येवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. आॅक्सफर्ड इकाॅनाॅमिक्स या ब्रिटनच्या संस्थेनुसार या संसर्गामुळे या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये चीनचा वृद्धिदर २ % कमी हाेईल.

संसर्ग झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेत ६ % दराने वाढण्याचा अंदाज हाेता. आता हा अंदाज कमी करून आता ४ टक्के करण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूर्ण वर्षासाठी चीनच्या जीडीपी वाढीचा अंदाज घटविण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी हा अंदाज ६ % हाेता.

आता ताे ५.६ % वर आला आहे. आॅक्सफर्ड इकाॅनाॅमिक्सच्या मते चीन संसर्गाशी निगडीत सर्व वाईट शंका टाळण्यात यशस्वी हाेईल असे गृहित धरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर असे झाले नाही तर चीनसह जगभरातील सर्व अर्थव्यवस्थांना आणखी नुकसान सहन करावे लागेल अशी भिती जगभरात व्यंक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button