breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापाैरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार मागणीवरुन परिषद गाजली

नागपूर –  महाराष्ट्र महापौरांची सोळाव्या परिषदेत महापौर अधिकाराच्या मागणीवरून गाजली. महानगरपालिकांमध्ये महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार मिळावे. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या हाती सर्व सत्ता देण्याऐवजी अधिकारांचे विकेंद्रीकरण करावे, अशी मागणी राज्यातील महापौरांकडून करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते. वनामती येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर, नागपुरच्या महापौर नंदा जिचकार, संयोजक रणजित चव्हाण उपस्थित होते. मनपा आयुक्तांच्या हाती सर्व सत्ता नको. महापौरांनादेखील आर्थिक व प्रशासकीय अधिकार देण्याची गरज आहे, अशी मागणी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. तर महानगरपालिकांना निधीची कमतरता भासत असून राज्य शासनाने मदत करावी, असे नंदा जिचकार म्हणाल्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांचे अधिकार वाढविण्याबाबत गंभीरतेने विचार करू, असे आश्वासन दिले. आम्ही आमच्या बाजूने विचार करुच. मात्र महानगरपालिकांनीदेखील विकास आराखड्याला महत्त्व देण्याची गरज आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयातून काम केले पाहिजे. अन्यथा महानगरपालिकांचा विकास होऊच शकणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button