breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; ११ जणांचा मृत्यू, १२ जखमी

अमेरिकेत पीटर्सबर्ग सिनगॉग येथे ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती केडीकेएकडून देण्यात आली आहे. या गोळीबाराबाबत नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी काही मार्ग बंद केले असून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पीटसबर्गमधील घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे टि्वट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा गोळीबार भीषण असल्याचं सांगितलं. शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, इतकी वर्षं झाली तरी हे सारखं सारखं बघावं लागतंय, हे लाजिरवाणं आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांना पार्सल बॉम्ब पाठवण्यात आला होता. अमेरिकेत यापूर्वी सुद्धा गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Donald J. Trump

@realDonaldTrump

All of America is in mourning over the mass murder of Jewish Americans at the Tree of Life Synagogue in Pittsburgh. We pray for those who perished and their loved ones, and our hearts go out to the brave police officers who sustained serious injuries…

Donald J. Trump

@realDonaldTrump

…This evil Anti-Semitic attack is an assault on humanity. It will take all of us working together to extract the poison of Anti-Semitism from our world. We must unite to conquer hate.

अटक करण्यात आलेल्या ४६ वर्षीय बंदूकधाऱ्याचं नाव रॉबर्ट बॉवर्स असून तो सुद्धा जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय गोळीबारात जखमी दोघांची नाजूक अवस्था आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button