breaking-newsआंतरराष्टीय

बेकायदा स्थलांतरितांना तीन वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला

अमेरिकेत टाळेबंदीचे २९ दिवस पूर्ण

गेले महिनाभर सुरू असलेल्या शटडाऊन म्हणजे टाळेबंदीच्या मुद्दय़ावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्तावही डेमोक्रॅटिक पक्षाने फेटाळला आहे. मेक्सिकोलगतच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी कागदपत्रे नसलेल्या काही स्थलांतरितांना आम्ही देशातून बाहेर काढण्यापासून संरक्षण देऊ, पण भिंतीसाठी लागणारे ५.७ अब्ज डॉलर्स मंजूर करावेत असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

डेमोक्रॅटिक पक्षाने हा प्रस्ताव लगेचच फेटाळला असून ट्रम्प यांनी आधी सरकारची आर्थिक कोंडी दूर करावी मगच सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल असे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथून केलेल्या भाषणात विरोधकांना हा प्रस्ताव देताना असे सांगितले होते की, जे तरूण स्थलांतरित येत आहेत त्यांना आम्ही देशाबाहेर काढणार नाही, त्यांना तूर्त संरक्षण दिले  जाईल पण त्याबदल्यात भिंतीसाठी निधी मंजूर करावा. ८०० दशलक्ष डॉलर्सची मानवी मदत व ८०५ दशलक्ष डॉलर्सची अंमली पदार्थ शोध तंत्रज्ञान यंत्रणा उभारण्याचे प्रस्तावही त्यांनी दिले आहेत. सीमेवर सुरक्षा वाढवण्यात येईल, स्थलांतर सुधारणा राबवताना विश्वास व सदिच्छेचे वातावरण निर्माण केले जाईल.

ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष  व प्रतिनिधिगृहाच्या प्रमुख नॅन्सी पेलोसी यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक पक्ष यांनी सीमेवर भिंत बांधण्याबाबत घेतलेल्या एकमेकांविरोधातील पवित्र्याने ट्रम्प यांनी आर्थिक तरतुदी अडवल्या असून अमेरिकेत टाळेबंदी सुरू आहे. त्याचा २९ वा दिवस पार पडला असून आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व काम नाही. सर्व विभागांचे कामकाज कोलमडले आहे. आईवडिलांनी बेकायदेशीररीत्या येथे आणलेल्या सात लाख मुलांना आपण तूर्त तीन वर्षांकरिता सवलत देण्यास तयार आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button