breaking-newsपिंपरी / चिंचवड

दुकानदारांनी अपंगांना पहिले प्रधान्य द्यावे, महापालिकेचा आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत काही दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी सूट देण्यात आली. मात्र, खरेदीसाठी दुकानांसमोर लागलेल्या ग्राहकांच्या रांगा पाहता अपंग ग्राहकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची बाब समोर आली आहे. तरी, दुकानदाराने इतर ग्राहकांप्रमाणे अपंगांना गृहीत न धरता त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, असा आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी काढला आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. दरम्यान, नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत होऊ नये, याचा विचार करून काही व्यवसायिकांना 18 जुलैपासून लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत काही दुकाने खुली असतात. भाजीपाला, किराणा, मटण-चिकन विक्री करणा-या दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामध्ये अपंग ग्राहकांची वेगळी रांग केली जात नाही. किंवा त्यांना प्राधान्याने वस्तू दिल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दुकानांसमोरील रांगेत अपंग ग्राहकांना उभा न करता त्यांची स्वतंत्र रांग करावी. शक्य नाही झाल्यास अपंग ग्राहकांना प्रथम प्राधान्य द्यावे. अपंगांकडे दुचाकी नसते, काहींना भाड्याने रिक्षा करणे परवडत नाही. त्यात बस सेवा देखील बंद आहे. कुबड्यांचा आधार घेत त्यांना खरेदी करावी लागते. तरी, अपंगांना दुकानदारांनी पहिले प्राधान्य द्यावे, अशा सूचना समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button