breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करा: माजी विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी |

रहाटणी चौक ते रहाटणी फाटा रस्त्याचे सिमेट कॉंक्रीटीकरणाचे काम चालू आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूस परिसराला पाणी पुरवठा करणारे मुख्य ४ पाईप लाईन आहेत. या पाईप लाईनच्या पूर्व नियोजनाबाबत महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी दुर्लक्ष करत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी आहेत त्यामुळेे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे.

या परिसरातील काही बैठी घरे, कॉलनी, सोसायटी यांना अमृत योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु मुख्य पाईप लाईनला कनेक्शन करण्यास अडचण येत असल्याने अमृत योजने अंतर्गत नवीन कनेक्शन देण्याचे व पाणी पुरवठा करण्याचे काम ठप्प झालेले आहे. कारण या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झालेले आहे. तसेच मुख्य पाईप लाईन या रस्त्याचा दोन्ही बाजूस असलेमुळे व त्या पाईप लाईन रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामात गाडले गेलेले आहेत. ही बाब पाणी पुरवठा अधिकारी व रस्त्याच्या ठेकेदाराच्या वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणलेली आहे. त्यामुळे घटनास्थळी आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करावी.

तसेच या परिसरातील पाणी पुरवठा व पाईप लाईनच्या समस्येबाबत पाणी पुरवठा अधिकारी यांची वेळोवेळी बैठक घेवून, प्रत्यक्ष चालू कामावर जावून त्यांना या बाबत कल्पना देण्यात आलेली होती. तरीही अधिकारी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष व टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे भविष्यात सदर कॉंक्रीटीकरण केलेला रस्ता तोडण्याची वेळ महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे येणार आहे. यामुळे महापालिकेस लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. तसेच या परिसराला भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे त्यास जबाबदार कोण.? असा सवाल काटे यांनी निवेदनातून केलेला आहे.

वाचा- सायन्सपार्क ३० जानेवारीपासून नागरिकांसाठी खुले होणार..!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button