breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

BCCI क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत, पाच वर्षांत २७,००० कोटींहून अधिक कमाई

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. BCCI ने पाच वर्षांत २७,००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. BCCI ने बंपर कमाईसोबतच मोठ्या प्रमाणात टॅक्सही भरला आहे. BCCI ने २०१८ ते २०२२ दरम्यान २७,४११ कोटी रूपयांची भरघोस कमाई केली आहे.

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या उत्पन्नासंदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या की, बीसीसीआयला हे उत्पन्न मीडिया हक्क (Media Rights), प्रायोजक (Sponsership) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महसूल शेअर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत.

हेही वाचा – ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी उभारला राष्ट्रध्वज 

BCCI नेही या पाच वर्षांत चांगला कर भरला असून त्याचा आकडा ४२९८ कोटी रुपये आहे. बीसीसीआयने या पाच वर्षांत १५,१७० कोटी रुपये खर्च दाखवला आहे. बीसीसीआयने आर्थिक वर्ष २०१८ मध्ये २९१७ कोटी रुपयांचा महसूल दाखवला होता, जो आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७६०६ कोटी रुपयांवर गेला. आयपीएल आणि भारतीय क्रिकेटच्या मीडिया हक्कांच्या किमतीत वाढ हे त्यामागचे मुख्य कारण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button