breaking-newsराष्ट्रिय

ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करा, भोपाळमध्ये झळकली पोस्टर्स

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनाच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवा अशी मागणी करणारे पोस्टर्स मध्यप्रदेशात लागले आहेत. राहुल गांधींनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टर्स मध्ये म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी घरण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांना अनेक दिग्गज नेत्यांनी विनंती करूनही ते राजीनाम्यावर ठाम राहिले. आता राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला दिलं जाणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ANI

@ANI

Madhya Pradesh: Poster appealing Rahul Gandhi to appoint Jyotiraditya Scindia as the Congress party President, seen outside Pradesh Congress Committee office in Bhopal.

32 people are talking about this

या सगळ्या वातावरणात मोतीलाल वोरा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली जातील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी स्वतःच ही चर्चा फेटाळून लावली आहे. आता भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावत ज्योतिरादित्य सिधिंया यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करा अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदांचे राजीनामे दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आलेल्या मिलिंद देवरा यांनीही अवघ्या चार महिन्यांमध्ये पदाचा राजीनामा सादर केला. मात्र, देवरा यांनी राजीनाम्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबईत पक्षाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडला आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमा अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button