breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोनामुळे शिर्डीत भक्तांविना गुढीपाडवा

शिर्डी – दरवर्षी मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकजण शिर्डीची वाट धरतात. गुढीपाडव्याच्या दिवशी शिर्डीचं साईबाबांचं मंदिर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेलेलं असतं. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद आहे. आज प्रमुख पुजाऱ्यांच्या हस्ते शिर्डीमध्ये गुढी उभारून अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षी आणि यंदा शिर्डीतील चित्र वेगळं आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षीसुद्धा शिर्डीचं साईमंदिर बंद होतं आणि यंदाही बंद आहे. आज अत्यंत तुरळक भक्त साई मंदिराजवळ येत आहेत आणि त्यांना कळसाचं दर्शन घेऊन माघारी परतावं लागत आहे. या कळसावर गुढी उभारून साई संस्थानकडून अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button