breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नी याने केली निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली – भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.गेली बरीच वर्ष स्टुअर्ट बिन्नी क्रिकेट मैदानापासून लांब होता. भारतीय संघातून बाहेर असलेल्या बिन्नीने हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याला पुढील जीवनासाठी शुभेच्छ दिल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याला अनेक क्रिकेटप्रेमी शुभेच्छा देत आहेत.

बिन्नीने २०१४ मध्ये न्‍यूझीलंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केले होते. त्याने भारताकडून ६ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ३ टी-20 सामने खेळले आहेत.३७ वर्षीय बिन्‍नी २०१६ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये दिसणारा बिन्नी पुन्हा भारतीय संघात येण्यासाठी प्रयत्न करत होता. पण अखेर संधी न मिळाल्याने टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर बिन्नीने हा निर्णय घेतला आहे.त्याने एकदिवसीय सामन्यात २०१४ साली बांग्‍लादेशच्या विरुद्ध केवळ ४ धावा देत ६ बळी घेतले हाेते. त्याचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे.

स्टुवर्टची कारकीर्द
बिन्‍नीने कसोटी क्रिकेटमध्ये १९४ धावा आणि ३ विकेट घेतले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यांत २३० धावांसह २० विकेट पटकावले आहेत. याशिवाय टी-20 सामन्यांत ३५ धावा करत १ विकेट घेतला आहे. तर ९५प्रथम श्रेमी सामन्यात ४ हजार ७९६ धावा करत १४८ विकेट घेतले आहेत.बिन्नी हा दिग्गज भारतीय क्रिकेटर रोजर बिन्नी यांचा मुलगा आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच लोअर मिडल ऑर्डर मध्ये हार्ड हिटिंग फलंदाज होता.सुरूवातीला बिन्नी कर्नाटकच्या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. २००७ साली त्याला भारतीय क्रिकेट लीग साठी करारबद्ध करण्यात आले. तो हैदराबाद हिरोज आणि इंडिया इलेवन साठी खेळला.२०१३ साली साऊथ आफ्रिका दौर्‍यासाठी त्याला भारतीय ए टीम मध्ये निवडण्यात आले. तेथील शानदार काम्गिरीनंतर पुढील वर्षीच त्याची भारतीय संघात वनडे मॅच मध्ये पदार्पणाची संधी मिळाली हाेती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button