breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिका वाचनालय, ग्रंथालये सुरु करा; भाजपा युवा मोर्चाची मागणी

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड महापालिका अंतर्गत चालवण्यात येणारी ग्रंथालये आणि वाचनालये सुरू करावीत अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी यावेळी महापौर ऊषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष राहुल खाडे, प्रप्फुल थिटे, तेजस दरवडे, गणेश चव्हाण, अभिषेक हडवले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या सुरुवातीपासूनच शहरातील सर्व वाचनालये व ग्रंथालये बंदच होती. शहरातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५-२० दिवसावर आलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे खासगी वाचनालयात किंवा अभ्यासकेंद्रात प्रवेश घेणे अशक्य आहे. तसेच, खासगी वाचनालय व अभ्यासकेंद्रातील जागा जवळपास पुर्ण भरलेल्या असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीसुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्ष्यात घेता आणि शासनाद्वारे हळुहळु सर्व गोष्टी सुरु होत असतांना वाचनालये व ग्रंथालये सुद्धा सुरु करण्यात यावीत. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button