breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

बापरे! रूग्णाच्या पोटातून निघाल्या इअरफोन, लॉकेट, स्क्रू यांसारख्या तब्बल शंभरहून अधिक वस्तू

Trending : पंजाब राज्यातील मेगा जिल्ह्यातील ही घटना आहे. ३ तासांच्या ऑपरेशननंतर या तरूणाच्या पोटातून इअर फोन, रिटेनर, नट बोल्ट, वॉशर, लॉकेट, स्क्रू आणि अशा डझनभर लोखंडी वस्तू काढण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णाला गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता.

कुलदीप सिंग याला येथील मोगा मेडीसिटी स्पेशिलीटी रुग्णालयात आणले तेव्हा त्याला हाय फिव्हर, उलट्या आणि पोटात दुखत होते. डॉक्टरांनी सांगितले की त्याला दोन ते तीन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास सुरुच होता.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर; म्हणाल्या, देशातील लहान लेकरालाही..

डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला तेव्हा त्याच्या पोटात लॉकेट, चेन, नट, बोल्ट, इअरफोन आणि अनेक सटरफटर वस्तू आढळल्या. त्यानंतर कुलदीप याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्याचे रुग्णालयाचे संचालक अजमेर सिंग कार्ला यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button