breaking-newsआरोग्य

महागड्या क्रिम्स वापरण्यापेक्षा करा फेशियल योगा आणि आपली त्वचा अधिक सुंदर बनवा…

शरीरातील इतर भागांप्रमाणे त्वचेची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. अनेक लोक नेहमी फिट राहण्यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष देत असतात. पण  त्वचेकडे लक्षं देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्यामुळे दिर्घकाळापर्यंत त्वचा चांगली राहू शकते. नेहमी  महागड्या क्रिम्स वापरून पैसे घालवून त्वचा चांगली दिसते असं नाही. काही  सोपे व्यायाम प्रकार करून सुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकता.  त्वचा चांगली राहण्यासाठी सगळयात महत्वाचं असतं ते म्हणजे न्यट्रीएंट्स, डाएट, चांगल्या झोपेची सुद्धा आवश्यकता असते. पण त्याचसोबत फेशियल योगाही महत्त्वाचा ठरतो…या योगा पद्धतीचा वापर करून आपण आपला चेहरा कोणताही खर्च न करता सुंदर बनवू शकतो. 

फेशियल योगा 

फेशियल योगा एकाप्रकारे सर्वसामान्य योगाप्रमाणे असतो. ज्याचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता. फेशियल एक्सरसाईज आणि मसाज याचा त्वचेला चांगलं बनवण्यासाठी वापर केला जातो. यासाठी तुम्ही खाली देण्यात आलेल्या व्यायाम प्रकाराच्या टीप्स वापरू शकता. 

किस एंड स्माईल

हसणे आणि किस करताना तोंडाची जशी हालचाल केली जाते ती तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल, पण  तुम्हाला माहित आहे का त्वचेसाठी हा व्यायामप्रकार  फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या ओठांना बाहेरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा. मग परत मुळ स्थितीवर आणा. हा व्यायाम प्रकार तुम्ही रोज दहा ते पंधरा वेळा कराल तर चेहरा सुंदर दिसेल. 

आइब्रोला खेचा

आपल्या हातात आयब्रोला पकडून  त्यांना आरामात वर पकडण्याचा प्रयत्न करा. नंतर पुन्हा पूर्वस्थितीवर आणून सोडून द्या. आयब्रो हातातून सोडत असताना हलका दबाब द्या.  हा व्यायाम प्रकार जर तुम्ही रोज  १० ते १५ वेळा कराल तर  आयब्रोसह  कपाळाचे सुद्धा मसल्स टोन चांगली राहिल. 

तोंडात हवा भरा आणि बाहेर टाका

हा व्यायाम प्रकार करण्यासाठी तुम्हाला शक्य असेल तितकी हवा तोंडात भरा. नंतर हळूहळू तोंडातून हवा बाहेर पाडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या गालांचा  चांगल्याप्रकारे व्यायाम होईल आणि त्वचा टवटवीत  राहील. त्याचसोबत तुमचे गाल खराब दिसत आहेत ते  गुबगुबीत  आणि आकर्षक दिसायला लागतील. 

गालांवरची चरबी अशी करा कमी

जर तुम्ही गालांच्या चरबीने कंटाळले असाल  तर दोन्ही  हातांनी गालावर मसाज करा.  खालच्या बाजूने सुरूवात करत वरच्या बाजूने मसाज करा.  ही पद्धत रोज ५ मिनिटं वापरल्यामुळे हळूहळू तुमची त्वचा चांगला होईल आणि वाढती चरबी कमी होईल.

फाइन लाइंस  दूर करण्यासाठी 

जर तुमचा गाल आणि डोळ्यांजवळ लाईन्स, सुरकुत्या असतील तर दूर करण्यासाठी सगळ्यात आधी श्वास घ्या. शक्य असेल तितका जास्त वेळ अशा स्थितीत रहा. नंतर तुम्ही हळूहळू नॉर्मल स्थितीवर या. यामुळे तुमचा चेहरा चांगला दिसू शकतो.  वयवाढीच्या खुणा निघून जाण्यास मदत होईल. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button