breaking-newsपिंपरी / चिंचवड

निगडीत लोकमान्य टिळकांचा पुर्णाकृती पुतळा उभारा – सचिन चिखले

पिंपरी, (महाईन्यूज) – निगडी येथील लोकमान्य टिळक यांचा पुतळा पुर्णकृती उभारण्यात यावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

निगडीतील लोकमान्य टिळक चौकामध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला चिखले यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी चिखले यांनी हा अर्धाकृती पुतळा पुर्णाकृती बांधण्याची मागणी महापौर राहूल जाधव यांच्याकडे केली.

लोकमान्य टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये देशकार्याला वाहुन घेण्याचा संकल्प केला. पुढे ते शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढत राहिले. अशा थोर महापुरुषांचा येथील पुर्णकृती पुतळा उभारण्यात यावा. शहरातील बरेच काही पुतळे आपण पुर्णकृती केले आहेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेना वेळोवेळी पाठपुराव करत आहे, अशी मागणी मनसेचे चिखले यांच्यासह माजी नगरसेविका आश्विनी चिखले, भास्कर जामदार, सदाशिव कोकाटे, वसंत काटकर, रोहित काळभोर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button