breaking-newsमनोरंजन

शिल्पा शेट्टीनं बनवला ‘या’ मराठी मालिकेच्या टायटल सॉंगवर Tik Tok चा व्हिडीओ

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना मराठी प्रेमाचं भरतं आले आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. आमिर खाननेसुद्धा वेळोवेळी त्याचा मराठी बाणा दाखवला आहे. यात शिल्पा शेट्टीही मागे नाही. तिने कोणत्या मराठी सिनेमात काम केले नाही किंवा कोणत्या मराठी सिनेमाची निर्मिती केली नाही तर. टीक -टॉकवर तिने मराठीतील सुप्रसिद्ध गाण्यावर व्हिडीओ केला आहे. त्याला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.  हे गाणं झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली मालिका ‘माझा होशील ना’ च टायटल सॉंग आहे…

शिल्पानं बनवलेला टिकटॉक व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरला असून  तिच्या चेहऱ्यावरचे उत्कृष्ट हावभाव पाहून चाहते तिच्यावर फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आर्या आंबेकरनं गायलं आहे.

शिल्पानं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली होती. आर्यानं गायलेल्या शिर्षक गीतावर शिल्पानं टिकटॉक व्हिडिओ बनवल्यानं तिनं देखील आनंद व्यक्त करत ‘फॅनगर्ल’ असं म्हटलं होत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button