breaking-newsराष्ट्रिय

मला कुठलीही जबाबदारी देऊ नका, अरुण जेटलींचे नरेंद्र मोदींना पत्र

प्रकृतीच्या कारणास्तव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नव्या सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत. अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात नव्या सरकारमध्ये आपल्याला कुठलीही जबाबदारी देऊ नये अशी विनंती केली आहे. सलग दुसऱ्यांदा केंद्रात बहुमत मिळवणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा उद्या ३० मे रोजी शपथविधी होणार आहे.

ANI

@ANI

Arun Jaitley writes to Prime Minister Narendra Modi-“I am writing to you to formally request you that I should be allowed a reasonable time for myself, my treatment and my health, and, therefore, not be a part of any responsibility, for the present, in the new Government.”

198 people are talking about this

अरुण जेटली मागच्या काही काळापासून आजारी आहेत. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात असणार की, नाही याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अखेर जेटली यांनीच मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही हे स्पष्ट करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सलग दुसऱ्यांदा केंद्रात पूर्ण बहुमत मिळवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button