breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये 716 नवीन कोरोना बाधित रुग्ण

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा आलेख उतरणीस आला आहे. शहराच्या विविध भागातील 716 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 99 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 29 आणि महापालिका हद्दीबाहेरील 17 अशा 46 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 44 हजार 663 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 13 हजार 361 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 8 हजार 795 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 566 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 227 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 848 झाले आहेत. आज दिवसभरात एकाचेही लसीकरण झाले नाही. कालपर्यंत 4 लाख 70 हजार 942 जणांनी लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button