breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेची मजूर महिला झाली बारावी उत्तीर्ण

पिंपरी – महापालिकेतील नगरसचिव विभागातील मजूर महिलेने नोकरी करून बारावीच्या परिक्षेत यश मिळविले आहे. शिला लक्ष्मण सूर्यवंशी असे त्या महिलेचे नाव असून शिक्षणाविषयी असलेल्या जिद्दीबद्दल महापालिकेत कौतुक होत आहे. बारावीची निकालपत्र हाती पडल्यानंतर सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावर आंनद पाहायला मिळाला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज लागला. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मजूर महिलेने कुटुंब सांभाळत यश मिळविले आहे. बारावीच्या परीक्षेत ५६ टक्के गुण मिळविले आहेत. सूर्यवंशी या मूळच्या जळगावच्या असून कामगारनगरमध्ये राहतात. त्यांनी जळगाव येथून १४ वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा दिली होती. मात्र, पुढे लग्न झाल्यानंतर त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले होते. त्यानंतर लग्न होऊन पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर काही वर्षांत पतींचा मृत्यू झाला. त्यामुळे सासू सासरे आणि दोन मुले अशी कुटुंबाची जबाबदारी सूर्यवंशी यांच्यावर आली. त्यांना अनुकंपा तत्वावर महापालिकेत मजूर या पदावर नोकरी मिळाली. सध्या नगरसचिव कार्यालयात शिपाई म्हणून काम पाहत आहेत. त्यांना दोन अपत्ये असून मोठी मुलगी सातवीत दुसरे अपत्य तिसरीत शिक्षण घेत आहे.

शिला सूर्यवंशी म्हणाल्या, शिक्षण घेण्याची आवड होती. मात्र, परिस्थिमुळे शिक्षण थांबले. पुढे कुटुंबाची जबाबदारी आली. माझी मुलगी सातवीत आहे. आमच्या विभागातील सहकार्यांनी मला प्रोत्साहन दिले म्हणून परिक्षा दिली. नोकरी आणि कुटुंब सांभाळून अभ्यास केला. आणि आज उत्तीर्ण झाले. खूप आनंद झाला आहे.

कुटुंबावर आलेली जबाबदारी पेलली
शिक्षणाविषयी असणारी जिद्द आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला आणि चिंचवड येथील फत्तेचंद जैन शाळेत प्रवेश घेतला. यासाठी नगरसचिव विभागातील सहकार्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. फेब्रुवारीत झालेल्या बारावीची परिक्षा दिली. महिलेच्या शिक्षणविषयक जिद्दीला महापालिकेने सलाम केला आहे. सूर्यवंशी यांच्या यशाबद्दल स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसचिव उल्हास जगताप उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button