breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

डोक्यात हातोडा घालून टीव्ही अभिनेत्रीने केली एक्स-बॉयफ्रेन्डची हत्या

तामिळनाडू | महाईन्यूज

तामिळनाडूच्या चेन्नईत हत्येचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. 42 वर्षांची एक टीव्ही अभिनेत्री या हत्येतील आरोपी असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. या टीव्ही अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला इतकी बेदम मारहाण केली की त्याचा यात मृत्यू झाला. या अभिनेत्रीचे नाव एस. देवी आहे. या घटनेत रवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर देवीने खुद्द पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपला गुन्हा कबूल केला. 8 वर्षांपूर्वी देवी व रवीची ओळख झालेली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. देवी आधीच विवाहित होती. दोन वर्षांपूर्वी देवीच्या पतीला या अफेअरबद्दल कळाले होते. यानंतर नव-याने देवीला रवीपासून दूर राहण्यास बजावले. त्याने देवीला शिवणकामाची मशीन घेऊन दिली आणि देवीने अभिनयाबरोबरच टेलरिंगचे कामही सुरू केले. देवीचा पती फर्निचरचे दुकान चालवतो. पण रवीला देवीचा विरह सहन झाला नाही. त्याने देवीचा शोध सुरु केला आणि तिच्याबद्दल माहिती मिळवली.

रविवारी मध्यरात्रीनंतर रवी देवीची बहीण लक्ष्मीच्या घरी पोहोचला आणि लक्ष्मीला पुन्हा सोबत येण्याचा आग्रह धरला होता. लक्ष्मीने देवीला बोलावले व त्यानंतर देवी आणि तिचा नवरा तिथे पोहोचले. देवीला पाहून रवीने पुन्हा तिला आपल्या सोबत चालण्यासाठी आग्रह केले. यावरून भांडण सुरू झाले. याच दरम्यान रागाच्या भरात देवीने हातोड्याने रवीचे डोके फोडले आणि रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्वत: देवीने राजामंगलम पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यामध्ये देवीसोबत तिचा पती बी. व्ही. शंकर यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button