breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मनी लाँडरिंग प्रकरण: रॉबर्ट वढेरांना गुंतवणुकीसाठी मदत करणाऱ्या उद्योजकाला अटक

दिल्ली | महाईन्यूज

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर गुन्हा दाखल असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आलेली आहे. वढेरा यांचे सहकारी असलेल्या एका अनिवासी भारतीय उद्योजकाला ईडीने अटक केली आहे. सी.सी. थंपी असं या उद्योजकाचं नाव असून, थंपी यांनी लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वढेरा यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे.

रॉबर्ट वढेरा यांच्याविरूद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरूच आहे. याच प्रकरणात ईडीने सी.सी. थंपी यांना अटक केली आहे. थंपी हे अनिवासी भारतीय उद्योजक असून, ते वढेरांचे जवळचे सहकारी आहे. त्यांनी वढेरा यांना लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास मदत केली, असा आरोप आहे. थंपी यांची स्कायलाईट एझेडई नावाची दुबईत कंपनी आहे. या कंपनीचे वढेरांच्या नावे भारतात असलेल्या कंपनीत शेअर आहेत. अनेक देशातून करण्यात आलेल्या बँकिंग व्यवहाराच्या पावत्यांमुळे ईडीच्या तपासाला दिशा मिळाली आणि ती थंपी यांच्या अटकेपर्यंत पोहोचली आहे. वढेरा आणि भंडारी यांच्यासोबत जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा पुरावा असल्याचा दावा ईडीनं केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button