breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गृह मंत्रालय म्हणाले, “तुकडे-तुकडे गँगची माहिती नाही” अमित शाह तोंडघशी

दिल्ली | महाईन्यूज |

केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिलेली आहे.भाजपाच्या नेत्यांकडून अनेकदा भाषणामध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा देशात विभाजन घडवण्याचा डाव आहे अशी टीका केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये २०१६ साली झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर भाजपाच्या नेत्यांकडून ‘तुकडे तुकडे गँग’ हा उल्लेख वरचे वर होऊ लागला. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती. याच अर्जाला आलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत गोखले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशणा साधलेला आहे.

“केंद्रीय गृहमंत्रालयाने मी केलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं या उत्तरामध्ये म्हटलं आहे. म्हणजेच तुकडे तुकडे गँग अस्तित्वात नाही. ती केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत आहे,” असे ट्विट गोखले यांनी केलेलं आहे.

अमित शाह हे राजकीय भाषणांमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा उल्लेख करतात यासंदर्भात निवडणुक आयोगाने दखल घ्यावी यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे गोखले सांगतात. “सभा आणि भाषणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री हे शब्द का वापरतात हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे किंवा लोकांसमोर खोटं बोलल्याबद्दल आणि त्यांची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागायला हवी,” असं गोखलेंनी म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button