breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल’ – नवाब मलिक

मुंबई | भाजपने फोडाफोडीचे राजकारण करु नये. ११९ सदस्यांचा पाठिंबा असणाऱ्या भाजपकडे आता किती जणांचा पाठिंबा आहे ते, आधी तपासा. जर आम्ही मनावर घेतले तर भाजपच रिकामा होईल, हे लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेताना प्रोटोकॉलनुसार शपथ घेतलेली नाही. त्यामुळे ही शपथ बेकायदेशीर असून ती रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

यावरुन प्रश्न विचारल्यानंतर भाजपने मलिकांना कडक इशारा दिला. लोकसभेच्यावेळी भाजपने काय केले आहे, ते माहित आहे. आधी लोकसभाच बरखास्त करावी, लागेत असा पलटवार नवाब मलिक यांनी केला. शपथविधीपूर्वी नेत्यांची नावे घेण्याची प्रथा ही भाजपची आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. असे असेल तर भाजपच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल. भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवू नये. अन्यथा लोकसभाच बरखास्त करावी लागेल, असा स्पष्ट इशाराच दिला. तसेच फोडाफोडीचे राजकारण भाजपने करु नये. आम्ही जर ठरवले तर भाजप पूर्ण रिकामा होईल. हिंमत असेल तर भाजपने मतदान घेऊन बघावे. ११९ आमदारही भाजपकडे नाहीत. सत्तेची लालसा दाखवून भाजपने नेत्यांना प्रवेश दिला. आज भाजपची सत्ता बनत नसल्याने तेही आमदारही आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. आमच्याकडे १७०चा आकडा आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button