breaking-newsपुणे

स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई नको; चर्चेतून तोडगा काढा : अजित संचेती

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदारांना महाराष्ट शासनाकडून संरक्षण विमा मिळावे या बाबत ते आंदोलन करत आहेत अशा बाबतीत स्वस्त धान्य दुकानदारांनवर कार्यवाही करू नये, अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष अजित संचेती यांनी केली आहे.

याबाबत पुणे अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांना दिलेल्या निवेदानात म्हटले आहे की,  राज्यासह,देशावर कोरोनाचे मोठ संकट आले आहे,यात आपल्या महाराष्ट्र मधील सर्व स्वस्त धान्य दुकानदारां आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या पोलीस खात्या सारखी जनतेची सेवा करत आहे, आज पर्यंत पत्रव्यवहार करून सुद्धा सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहेत,यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड मधील एक ही स्वस्त धान्य दुकान येत्या 1 जून पासून उघडू देणार नाही,असे निवेदन आम्ही अन्न पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री मा.छगन भुजबळ साहेब यांना व आपल्याला ही दिले आहे,आपणस विनंती करत आहोत की आज या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदार काम करत आहेत,त्यांचा  व त्यांच्या परिवाराचा आपण विचार करावा,आशा काळात  तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू नये,यासाठी आपण ही चर्चा करून यावर मार्ग काढावा, अशी मागणीही संचेती यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button