breaking-newsपिंपरी / चिंचवड

मकर संक्रांतीनिमित्त ‘चॅलेंजर पब्लिक स्कूल’मध्ये भरली चिमुकल्यांची बाजारपेठ

  • अध्यक्ष संदीप काटे यांनी केली वस्तुंची खरेदी
  • शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली अनोखी प्रेरणा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहरात सर्वत्र मकर संक्रांतीचा माहोल असतानाच आज भोगी साजरी करण्यात आली. याचे निमित्त साधून पौष्टीक मिष्ठान्न शरिराला किती उपयुक्त असते हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी पिंपळे सौदागरच्या ”चॅलेंजर पब्लिक स्कूल”मध्ये इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तिळगुळ, तिळापासून बनविलेली रेवडी, बर्फी, चिक्की, लाडू, हलवा अशा पदार्थ विक्रीची बाजारपेठ भरविली होती. शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक संदीप काटे यांनी गोडधोड पदार्थ खरेदी करून चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अनोख्या बाजारपेठेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांच्या हस्ते लाल रेबीन कापून करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रचार्या सुषमा उपाध्ये, शिक्षक ज्योती थोरात, प्रिती तळेकर, मनिषा दाभाडीकर, प्रियंका गवसने, प्राजक्ता सहजे, सायली पवार, सेजल पाटील, समन्वयक रुपाली कुलकर्णी, मधुरा भोसेकर, देवयानी शिंदे, शलाका शिंदे आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या संकल्पनेतून ही अनोखी बाजारपेठ भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पुर्वी, विद्यार्थ्यांच्या पालकांचा अभिप्राय घेण्यात आला होता. भोगीनिमित्त खरेदी-विक्रीसाठीचे आवश्यक साहित्य, पदार्थ विद्यार्थ्यांनी घरूनच बनवून आणले होते.

पिंपळे सौदागर : ”चॅलेंजर पब्लिक स्कूल”मध्ये चिमुकल्यांच्या बाजारपेठेत वस्तू खरेदीसाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांना विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिले. यावेळी शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गामध्ये बाजारपेठ भरविली होती. भोगीसाठी आवश्यक पदार्थ, साहित्य आणि वस्तूंची बाजारपेठेत रेलचेल होती. पहिली ते तिसरीचे विद्यार्थी व्यावसायिकाच्या भूमिकेत होते. तर, शाळेतील शिक्षक ग्राहकाच्या भूमिकेत बाजारातील पदार्थांची खरेदी करत होते. तिळाचे लाडू, चिक्की, रेवडी, चॉकलेट्स, केक, बिस्कीट, हलवा आदी मिष्ठान्ना पदार्थ खरेदीचा त्यांनी आनंद लुटला. तिळाचे लाडू 10 रुपये, चिक्की 5 रुपये, चॉकलेट्स 10 रुपये, केक 15 रुपये, बिस्कीट 10 रुपये अशा पदार्थ्यांच्या किंमती होत्या. अन्य वर्गातील विद्यार्थ्यांनी देखील या बाजारपेठेला भेट दिली.

विद्यार्थ्यांना भोगी आणि मकर संक्रातीचे महत्व कळावे. संक्रातीनिमित्त आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत गेल्यानंतर होणारा व्यवहार करण्याची कला ज्ञात व्हावी. खरेदीचा आनंद त्यांना घेता यावा. यासाठी शिक्षकांच्या संकल्पनेतून चिमुकल्यांची ही अनोखी बाजारपेठ भरविण्यात आली. असे नवनवीन उपक्रम शाळेत राबविले जातात.

संदीप काटे, संस्थापक अध्यक्ष, चॅलेंजर पब्लिक स्कूल
पिंपळे सौदागर : विद्यार्थ्यांनी शाळेत भरविलेल्या अनोख्या बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवलेले पदार्थ.

विद्यार्थ्यांसाठी ”बॅगलेस डे” ठरतोय नाविन्यपूर्ण उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी आज बॅगलेस डे उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मटकी भेळ आणि इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सॅण्डवीच उपहार बनवला. या विद्यार्थ्यांनी फायरलेस कुकींग केलेल्या सॅण्डवीच आणि भेळेचा मनमुराद आनंद घेतला. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आज पपेट शो देखील घेण्यात आला. पपेट शोमध्ये मुलांना कळसुत्री बाहुलीच्या अभिनृत्यातून शिक्षण घेण्याची संधी मिळाली. शाळेतील उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दर महिन्यातून एक दिवस ”बॅगलेस डे” घेतला जातो. विद्यार्थ्यांना पुस्तकविरहीत शिक्षण दिले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button