breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाडवा मेळाव्यात मनसे घेणार निर्णायक भूमिका; मावळ, शिरूरमध्ये सभांचे नियोजन

पिंपरी (महा-ई-न्यूज) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ आणि शिरूर मतदार संघात मनसे निर्णायक मुद्यांवर काम करणार आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मनसेच्या पदाधिका-यांची आज मुंबईतील कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेतली. दोन्ही मतदार संघातील मनसेच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मनसे मैदानात उतरणार असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलीच आहे. त्यासाठी मतदार संघनिहाय नागरिकांना भेडसावणा-या प्रमुख मुद्यांवर कार्याकर्त्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. आज बुधवारी (दि.२७) दुपारी एक वाजता मुंबईला कृष्णकुंजवर ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडच्या मनसैनिकांची बैठक घेतली. गुडी पाडव्याला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील मनसेची भूमिका निश्चित होईल. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते कामाला लागतील, असे ठरविण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

यावेळी पिंपरी-चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, मनविसे शहराध्यक्ष हेमंत डांगे, नाशिर शेख, शहर सचिव रूपेश पटेकर, विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, महिला सचिव सीमा बेलापुरकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button