breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मंगळवारपासून शिवाजीनगर बसस्थानक बंद होणार…

पुणे | महाईन्यूज |

मेट्रोच्या कामाला शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित केले जाणार आहे. मंगळवारपासून म्हणजेच दि. ३१ डिसेंबरपासून सर्व मार्गांवरील बस नियमित वेळापत्रकानुसार नवीन वाकडेवाडी स्थानकातून सुटणार आहेत. नवीन स्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती एसटी अधिका-यांनी दिली आहे.

वाकडेवाडी बसस्थानक

मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथे एसटीचे बसस्थानक आहे. तिथून मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणांसाठी बस संचलन सुरू आहे. पुण्यात मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर हे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी मेट्रोचे जमिनीखाली स्थानक होणार आहे. त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच काही महिने आधीपासून वाकडेवाडी येथील अंडी उबवणी केंद्राच्या जागेमध्ये नवीन बसस्थानक उभारणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तेथील कामही सुरू केले. पण विविध कारणांमुळे हे स्थलांतर रखडले होते. अखेर त्याला मुहूर्त मिळाला असून, मंगळवारपासून शिवाजीनगर स्थानकातील सर्व संचलन वाकडेवाडी येथील स्थानकातून केले जाणार आहे.

मात्र अचानक स्थलांतर केल्यास प्रवाशांची गैरसोय नक्कीच होऊ शकते.सध्या शिवाजीनगर बसस्थानकातून दररोज सुमारे १४०० बस ये-जा करतात. औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूर, अमरावती, अकोला, गेवराई, बीड, लातूर, पणजी यांसह विदर्भ व मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून या बस ये-जा करत आहेत. या सर्व बस आता वाकडेवाडी स्थानकातून सुटतील. यापैकी एकही बस शिवाजीनगरकडे येणार नाही. वाकडेवाडी येथे एकूण १९ फलाट उभारण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिवाजीनगर येथील बसस्थानकात ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेचा मोठा आधार होता. शहराच्या विविध भागांतून स्थानकात येणारे तसेच बाहेरगावाहून एसटीने आलेले प्रवासी पुढील प्रवासासाठी पीएमपीला पसंती देत. एसटी स्थानकालगतच पीएमपीचे स्थानक असल्याने त्याला प्राधान्य मिळत होते. पण एसटीचे स्थलांतर झाल्याने तिथे ये-जा करण्यासाठी विविध ठिकाणांहून बस उपलब्ध होऊ शकणार नाहीयेत.
या ठिकाणांहून केवळ काही मोजक्याच मार्गाच्या बस धावतात. त्यामुळे शहरात विविध ठिकाणांहून ये-जा करणाऱ्यां प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या सर्व प्रवाशांना रिक्षाचाच आधार घ्यावा लागणार आहे किंवा पायपीट करत शिवाजीनगर गाठावे लागणार आहे. दरम्यान, याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पीएमपी अधिकाऱ्यांनीही बसस्थानक स्थलांतर होत असल्याने पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम होईल, असे सांगितले. त्यामुळे वाकडेवाडी येथून बस वाढवण्याबाबत निर्णय़ घ्यावा लागेलं असही अधइका-यांनी सांगितलं आहे .
वाकडेवाडी येथील नवीन बसस्थानकामध्ये वर्कशॉपचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्व बस देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शिवाजीनगर येथील वर्कशॉपमध्येच येणार आहेत. तिथूनच या बस वाकडेवाडी स्थानकाकडे येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button