breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या फुगेवाडी दवाखान्यातील कामचुकार कर्मचा-यांची हकालपट्टी करा – युवासेनेची मागणी

पिंपरी | महाईन्यूज |प्रतिनिधी

नागरिकांशी मोठया आवाजात बोलणे, सतत  फोन मध्ये गेम्स खेळत बसणे, झोपून राहणे, अश्या तक्रारी पिंपरी युवासेनेकडे फुगेवाडी -कासारवाडी -दापोडी मधील लोकांनी केल्या आहेत. या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी पिंपरी युवासेनेने केली आहे.


युवासेनेचे पदाधिकारी गेले असता तसेच निदर्शनास आले. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अलवि हयांना युवासेना पिंपरीच्या वतीने निवदेन देऊन मागणी केली आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांची लवकर हकालपट्टी करावी. येत्या 15 दिवसात कारवाई नाही झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले.यावेळी युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, नंदू कांबळे, संजय निंगडोळे, विकास गायकवाड, शैलेश हाके उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button