breaking-newsराष्ट्रिय

विमानात बिघाड झाल्याने इर्मजन्सी लॅंडिंग

नवी दिल्ली- हैदराबाद विमानतळावरून उड्डाण केलेल्या जेट एअरवेजच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखून इंदूर विमातळावर इर्मजन्सी लॅंडिंग केल्याने मोठी दुर्घटना टळली. या विमानातील सर्व 96 प्रवाशी सुरक्षीत आहेत.
हैदराबाद विमातळावरून जेट एअरवेजच्या विमानाने आज सकाळी 10 वाजून 48 मिनिटांनी 96 प्रवाशांना घेऊन उड्डाण केले. हे विमान सुमारे 36 हजार फूट उंचीवर असताना आणि 850 ताशी वेगाने जात असताना अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आला. या विमानात एकूण 96 प्रवाशी आणि 7 क्रू मेंबर होते. विमानात बिघाड झाल्याचे कळताच एअरलाइनने अथॉरिटिज आणि जेट एअरवेजच्या इंजिनिअरिंग टीमला याची माहिती दिली.
इंजिनात बिघाड आल्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखून विमानाची स्पीड कमी केली. त्यानंतर इंदूर विमानतळावर इमरजन्सी लॅंडिंग केली. पायलटच्या प्रसंगावधनामुळे विमानातील 96 प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button