breaking-newsराष्ट्रिय

चिदम्बरम यांची जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

  • आयएनएक्स मीडिया प्रकरण

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी जामीन मिळण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

याप्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी चिदम्बरम यांच्या वतीने न्या. एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर केली. या याचिकेवर सुनावणी कधी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठविली जाईल, असे पीठाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी चिदम्बरम यांचा जामीन अर्ज फेटाळला त्याला चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. चिदम्बरम सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे आणि चिदम्बरम साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतील ही शक्यता नाकारता येत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन फेटाळताना स्पष्ट केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button