breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वारणा नदीकाठी शेतक-यांवर मगरीचा हल्ला; बैलाने वाचविला मालकाचा जीव

कोल्हापूर |महाईन्यूज|

पन्हाळ्याजवळ सातवे येथील वारणा नदी काठावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महेश काटे या शेतकऱ्यावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यावेळी बैलाने उलट बाजूला ओढल्यामुळे महेश काटे या शेतकऱ्याचे प्राण वाचले आहेत. आज दुपारी ही घटना घडली असून मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.

सातवे येथील वाण्याची मळी या परिसरात महेश आपल्या बैलांच्या साह्याने शेती मशागत करण्यासाठी गेला होता. दुपारी विश्रांतीपूर्वी बैलांना पाणी पाजण्यासाठी तो नदीवर घेऊन गेला. बैल पाणी पीत असताना तो शेतकरीही बैलांना धुण्यासाठी नदीपात्रात उतरला. त्यावेळी नदीतील एका मगरीने त्याच्या डाव्या पायाला पकडले आणि त्याला पाण्यात ओढण्यास सुरुवात केली.

मगरीने हल्ला चढवला तेव्हा शेतकऱ्याचा हात बैलाच्या दाव्याला जखडला होता. बैल पाण्यात असताना मगरीने पाण्यातच महेशचा पाय पकडल्यामुळे त्याला बाहेर पडणे शक्य होत नव्हते. पण तेव्हाच अचानक बैलाने आपला मोर्चा उलट दिशेला वळवून महेशला नदी बाहेर ओढून काढले. त्यानंतर महेशने आरडा -ओरडा केल्याने शेतातील शेतकरी गोळा झाले आणि त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात घेऊन गेले. दवाखाना परिसरात नातेवाईक व मित्रमंडळी यांनी गर्दी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button